MLA Nitin Deshmukh
MLA Nitin Deshmukh Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी: एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे अकोल्यातील बाळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार नितीन देशमुख हे सध्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३० ते ३५ आमदार असल्याचं बोलंलं जातयं. यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण आहे. अशात शिवसेनेच्या आमदाराला हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. (Shivsena MLA Nitin Deshmukh Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या तब्येतीच्या तक्रारीनंतर त्यांना सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यात आले. ते शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पक्षात नाराज आहेत. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल ३० ते ३५ आमदार सुरतमधील एका हॉटेलात थांबले आहेत.

आमदार नितीन देशमुख हे जानेवारी २०२२ मध्ये चर्चेत आले होते. यावेळी तहसीलदार कोटकर यांनी हे पत्र बाळापूरचे शिवसेना (Shiv Sena) आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात लिहीले होते. प्रभारी तहसीलदार योगेश कोटकर यांनी जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या तक्रारीत आमदार देशमुख यांच्या विरोधात राजकीय दबावाचा पाढा वाचला होता.

शिवसेनेचे संपर्कात नसलेले आमदार

1. एकनाथ शिंदे

2. शंभूराज देसाई

3. अब्दुल सत्तार

4. संदीपान भुमरे

5. भरत गोगावले

6. महेंद्र दळवी

7. संजय शिरसाठ

8. विश्वनाथ भोईर

9. बालाजी केणीकर

10. किमा दाबा पाटील

11. तानाजी सावंत

12. महेश शिंदे

13. थोरवे

14. शहाजी पाटील

15. प्रकाश आबिटकर

16. अनिल बाबर

17. किशोर अप्पा पाटील

18. संजय रायमुलकर

19. संजय गायकवाड

20. शांताराम मोरे

21. लता सोनवणे

22. श्रीनिवास वणगा

23. प्रकाश सुर्वे

24. ज्ञानेश्वर चौगुले

25. प्रताप सरनाईक

26. यामिनी जाधवॉ

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT