अब्दुल सत्तार - नारायण राणे - Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले....नाव राणे काम चार आणे!

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांचं काम हे चार आण्यांसारखं आहे. त्यांनी मोजकंच बोलावं, अन्यथात्यांना शिवसेनेच्या Shivsena स्टाईलने उत्तर दिलं जाईल. ईट का जवाब पत्थर से असे म्हणत ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. Shivsena Minister Abdul Sattar hits on Narayan Rane

आज पुण्यातील हांडेवाडी परिसर नाना भांगिरे यांनी केलेल्या विविध कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव व नागरसेविका प्राचीआल्हाट आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, "युती धर्म भाजपने पाळला असता तर अडीच वर्षे ते सत्तेत राहिले असते, अडीच वर्षे आम्ही सत्तेत राहिलो असतो. ते आंब्याच्या झाडाखाली बसले असते आता ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत," अजून तीन वर्षे बाकी असतानाच भाजपनं आधीच यात्रा काढली आहे, अशी टीकाही सत्तार यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व राणे एका ताटात जेवतील, असा दावा प्रवीण तोगडीया Pravin Togadia यांनी केला आहे. त्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले, "उद्धव ठाकरे कधीच नारायण राणे यांच्यासाठी जेवायला ताट करणार नाहीत आणि ताटत जेवू पण देणार नाहीत'' राणे यांच्या अटकेबाबत बोलताना सत्तार म्हणाले, "कायद्यापुढे कोणीही मोठा नाही कायदा हा सर्वांसाठी समान आहे केंद्रीय मंत्री असो अथवा कोणी असो,"

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT