Sanjay Raut  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Death Threat: संजय राऊत धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट, पुण्यातून एकाला अटक; आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलीस चक्रावले

Mumbai News : मुंबई पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांनी याबबात पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.

जयश्री मोरे

Sanjay Raut News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांना दुसऱ्यांदा धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र यावेळी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आल्याने चिंता वाढली होती. आमदार सुनील राऊत यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी वेगाने हालचाल सुरु करत तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुण्यातून एकाला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांनी याबबात पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. डीसीबी कराड यांनी म्हटलं की, खासदार संजय राऊत यांना काल धमकी मिळाल्यानंतर आज त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पोलिसांना याप्रकरणी एका आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. या तक्रारीवरून 504 (506 )2 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राहुल तळेकर या 23 वर्षीय तरुणाला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. राहुल मुळचा जालनाचा रहिवासी आहे. काल तो संजय राउत यांना फोन करत होता. मात्र फोन संजय राऊतांनी त्याचा फोन उचलला नाही. त्यानंतर राहुलने दारूच्या नशेत त्यांना धमकीचा मेसेज केला होता.

राहुल हा पुण्यात एक हॉटेल चालवतो. त्याचा कोणताही पॉलिटिकल किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड समोर आलेला नाही. राहुलचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी काहीही संबंध असल्याचं प्राथमिक तपासात तरी दिसत नाही. तपासात जे निष्पन्न होईल त्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं उपायुक्त कराड यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT