Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: भाजप अजून 10 वर्षं BMCची निवडणूक घेण्याचं धाडस करणार नाही, संजय राऊतांना असं का वाटतंय?

महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमुठ सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर संजय राऊतांनी हे ट्वीट केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका कधी लागणार याबाबत याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. भाजप-शिंदे गट महाविकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून निवडणुकी घेण्याची हिंमत करत नसल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्यात आता संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप अजून 10 वर्ष तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊताचं ट्वीट

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमुठ सभेतील गर्दाचा फोटो ट्वीट करत म्हटलं की, मविआच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजप अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल असे दिसत नाही. पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. दारूण पराभव निश्चित आहे. (Latest Political News)

सामनातूनही टीकास्त्र

महाविकास आघाडीच्या 'वज्रमुठी'च्या तडाख्याने 2019 मध्ये त्यांचा येथील सत्तेचा घास हिरावला गेला आहे. त्यात आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबईसह इतर महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका त्यांना खुणावू लागल्या आहेत, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

2019 मधील सत्ता गेल्याची तगमग आणि आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा महाविकास आघाडीच्या 'वज्रमुठी'चा तडाखा बसण्याची भीती, यामुळे या भाजपवाल्यांचा जीव कासावीस होत असावा. मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार 'इन्कमिंग' आणि मिंधे गट-भाजपचे जोरदार 'आऊट गोइंग' होत आहे, असं सामनातून म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

SCROLL FOR NEXT