Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची हिम्मत झाली नसती : संजय राऊत

आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची हिम्मत झाली नसती. मी त्यांना चळाचळा कापताना बघितलं आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : बाळासाहेब ठाकरेंबरोबर ३० वर्ष काम केलं. ते असताना सुद्धा विरोधकांना सामनातून मीच उत्तर द्यायचो. अजूनही आमच्या पक्षात अनेक लढवय्ये आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची हिम्मत झाली नसती. मी त्यांना चळाचळा कापताना बघितलं आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. ( Maharashtra Politics Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

पुण्यात आज आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांच्या पुढाकाराने कनेक्ट महाराष्ट्र कॅानक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं.या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांची मुलाखत संपन्न झाली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी अनेक प्रश्नावर बेधडक उत्तरे दिली. संजय राऊत पुढे म्हणाले, 'आत्ता जे सरकार बनले ते बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. ते म्हणायचे ही ताकद एकत्र आली तर एकत्र आली तर दिल्लीला झुकवलं असतं'. 'महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून भाजप पक्ष वाढला. आज भाजपमधील ७५ टक्के लोक हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातून गेले आहेत. २०२४ च्या आधी यांचे अर्धे दुकान खाली होणार आहे',अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'आमच्या पेक्षा ही पिढी समाजाशी अधिक जोडली गेलेली आहे. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर आजची पिढी करते. माझी मुलगी मोबाईवर पेपर वाचते. लोकांच्या मनात जे विष पेरलं जातं, त्याचा प्रतिवाद करताना नवी पिढी दिसते. 'महाविकास आघाडी सरकार हे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने चाललेलं सरकार आहे. प्रबोधनकार समजून घ्यायचे असतील तर एकदा शरद पवार साहेबांचं व्याख्यान ठेवा, असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT