Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: ''बंदर के हात माचीस किसने दी'', संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरेंवरती (Raj Thackeray) जोरदार टीका केली आहे. आपल्या खांद्यावर जो भगवा आहे तो, ओरिजनल भगवा आहे. आपला भगवा टेम्पररी नाही असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवरती नाव न घेता टीका केली आहे. आज लोक पेटवा पेटवीची भाषा करत आहेत. आमचं अख्खं आयुष्य त्यात गेलं आहे. ''सवाल ये नही की बस्ती मे आग कैसे लगी, सवाल ये हे की बंदर के हात माचीस किसने दी''.

माचीस देऊन पण उपयोग नाही झाला कारण ती पेटायला काही तयार नाही असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंच्या आंदोलनावर नाव न घेता टीका केली आहे. हा महाराष्ट्र (Maharashtra) आंड्या-पांड्याचा नाही, लेच्या-पेच्यांचा नाही. गेली 15 वर्ष ज्यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरु झाला. हा पोटदुखीतून त्रास सुरु झाला असे म्हणत राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री देणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यालाही राऊतांनी खास शैलीत उत्तर दिले. महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे. छत्रपतींचा, फुले, शाहू, आंबेडकरांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे, अशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही कशाला विष पेरताय. या महाराष्ट्रला पहिला ब्राम्हण मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी दिला. बाळासाहेबांनी मुस्लीम मुख्यमंत्री देखील स्वीकारला.

बाळासाहेबांचे अंतुले हे लाडके मुख्यमंत्री होते, जे मुस्लिम होते. तुम्ही भोंग्यांचं राजकारण सुरु केले आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी जिंवतपणी यातना दिल्या ते आम्हाला बाळासाहेब सांगताहेत? अशी गंभीर टीका संजय राऊतांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT