Aditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

'आपल्या लोकांचा आवाज...'; मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या खासदारांच्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. यादरम्यान, या पाठिंब्यामुळे खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर आता शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : भाजपप्रणित एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी विनंती केली होती. शिवसेना खासदार हे भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा न दिल्यास बंडाळीच्या तयारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. या पाठिंब्यामुळे खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर आता शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Aditya Thackeray News In Marathi )

आदित्य ठाकरे म्हणाले, ' शिवसेनेनं नेहमी योग्य भूमिका मांडलेली आहे. याआधी प्रतिभा पाटील यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. एक आदिवासी महिला या पदावर जात आहेत. भाजपसोबत राजकीय वाद आहेत. ते आहेतच. मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली हे ठीक आहे. आपल्या लोकांचा आवाज ऐकायचा असतो. त्यात संजय राऊत नाराज असल्याच्या या बातम्या तुम्ही पसरवल्या'.

'शिवसैनिक पक्ष प्रमुखांच्या पाठीशी आहेत. ही प्रेम यात्रा आहे. लोकांना भेटत आहोत. कोणावर आरोप करत नाही. दुःख हे आहे की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. महाराष्ट्राचं नाव मोठं होत आहे ही पोट दुखी होती. म्हणून गद्दारी झाली', असे ते म्हणाले.

शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत दिला भाजपला पाठिंबा; जयंत पाटील म्हणाले...

शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तो भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची अनेकवेळा वेगळी भूमिका असते. त्यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT