sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

'महाराष्ट्रातील बोके, खोक्यावर बसले'; तुरुंगातून सुटताच संजय राऊतांची तोफ शिंदे गटावर धडाडली

मुंबई महापालिका हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली, अशा शब्दात शिवसेना नेता, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut news : 'महाराष्ट्रातील बोके, खोक्यावर बसले आहेत. आता शिवसेना केवळ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे. मुंबई महापालिका हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली, अशा शब्दात शिवसेना नेता, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या भांडुप निवासस्थानी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी शिंदे गट आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, ' मला ज्या रस्त्यावरून अटक केली. तेव्हा मी जाताना म्हटलं होतं की, मरण पत्करेन, पण शरण पत्करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या तीन महिन्यात फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शिवसेना तोडता आली नाही. ही अभेद्य शिवसेना आहे. ही बुलंद शिवसेना आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीने हे दाखवून दिलं आहे'.

' मशाल भडकलेली आहे. देशात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना राहील. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली आहे. त्यांनी संजय राऊतांना अटक करून देशातील राजकारणातील मोठी चूक केली आहे. न्यायालयाने सांगितले की संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. मला कितीही वेळा अटक केली तरी, मी शिवसेना सोडणार नाही. माझ्या अटकेची आदेश दिल्लीतून आले', असेही ते म्हणाले.

' महाराष्ट्रातील बोके, खोक्यावर बसले आहेत. आता शिवसेना केवळ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे. मुंबई महापालिका हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे. सुटका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. बोलताना त्यांचा ऊर भरून आला होता, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT