Babanrao Thorat Saam Tv
मुंबई/पुणे

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या बबनराव थोरातांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राज्यात शिवसेना (ShivSena) विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी आता हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पुणे पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे. थोरात यांनी हिंगोलीतील निष्ठा मेळाव्यात १ ऑगस्ट रोजी ‘‘जो कोणी गद्दरांची पहिली गाडी फोडेल त्याचा उध्द्वव ठाकरे यांच्याहस्ते बहूमान करण्यात येईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते.

या आवाहनानंतर संतप्त शिवसैनिकांनी (ShivSena) पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर दगडफेक केली. याचवेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही पुणे दौऱ्यावर होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, या प्रकरणी पुणे शहरात कोथरूड पोलीस ठाणे येथे कलम 307, 353, 332, 109,143, 147, 148, 149, 427, 504, 506 भादवि सह कलम 37(1)(3), 135 मपोका. (भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.क्र. 513/22) अन्वये दाखल केला असून, काळाचौकी पोलिसांनी थोरातांचा ताबा पुणेच्या कोथरूड पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले.

तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसैनिकांना केली अटक

उदय सावंत हल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांत (Police) गुन्हा दाखल नोंद झाला होता. पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरण संजय मोरे यांनी ट्विट केले आहे.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT