balasaheb thackeray speech Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: ...तर काळ्या बाजारात सुद्धा नाव मिळायचं नाही; बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना काय म्हणाले होते पाहा Video

Balasaheb Thackeray Speech: पैसा... 'पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा का नाव गेलं तर पुन्हा येत नाही... ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही'. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गोटात खळबळ माजली आहे. ठाकरे गटाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना आता धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, तर शिवसेना हे नावदेखील वापरता येणार नाही. या सगळ्या राजकीय संघर्षात ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आता काही जुनी भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या नावाबद्दल काय विचार करायचे आणि त्यासाठी ते किती संवेदनशील होते हे या व्हायरल व्हिडिओतून लक्षात येतं. (Shivsena Latest News )

पाहा व्हिडिओ -

बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणातील हा व्हिडिओ आहे. ज्यात ते शिवसैनिकांना म्हणतात, मी माझ्या वडिलांनी दिलेला कानमंत्र सांगतोय. तुम्हाला, या तरुण पोरांना सांगतोय. हे लक्षात घ्या, नाव आणि पैसा... 'पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा का नाव गेलं तर पुन्हा येत नाही... ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही'. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही. माझ्याकडून मी ती काळजी घेतो, इतरांनाही घ्यायला सांगतो. कारण, शिवसेना नाव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. ज्यादिवशी त्याला डाग लागेल तेव्हा तुम्ही-आम्ही संपलो... या व्हिडिओतून दोन्ही गटातील शिवसैनिक काय बोध घेतात हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे दोन फलंदाज गारद

Crime: अरविंदचं तिसरं लग्न, नंदिनीचा पाचवा नवरा; भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडल्या, फेसबुकवर लाईव्ह करत...

Face Care: महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा या घरगुती सामग्रीने चेहरा धुण्यास करा सुरुवात, मिळेल सोफ्ट ग्लोईंग स्किन

Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

MVP Annual Meeting: नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सभेत राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT