Eknath Shinde News, Raj Thackeray News, Latest Political News Updates Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : शिंदे गट मनसेसोबत जाणाच्या तयारीत? एकनाथ शिंदेंचा पुन्हा राज ठाकरेंना फोन

एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा राज ठाकरेंना फोन

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. शिवसेनेनं (Shivsena) 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे. त्यावर आता शिंदे (Eknath Shinde) गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन केल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Raj Thackeray Latest News)

“शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा फोनवर चर्चा केली. शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय परिस्थितीबद्दल बोलले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली,” असं एका मनसेच्या नेत्यानं सांगितलं आहे. (Eknath Shinde News in Marathi)

दरम्यान, आता राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या मौनाकडे शंकेच्या नजरेनं पाहिलं जात आहे. शिवसेनेत फुट पडतेय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आहेत, शिवसेनेवरील ठाकरेंचा ताबा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तरीही राज ठाकरे शांत कसे? अशी चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदे गट मनसेसोबत जाणार?

दरम्यान, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याने आता शिंदे गट मनसेत विलीन होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, सत्ता द्या, मी बदल घढजवून दाखवतो, अशी भूमिका राज ठाकरेंनी आपल्या सभेतून बोलून दाखवलेली होती. याशिवाय राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याऐवजी मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली जास्त संयुक्तिक असू शकतात, असाही एक पर्याय असल्याचं बोललं जातं.

विशेष बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही हिंदुत्व आणि ठाकरेंवरील श्रद्धा ही बंडखोरांना सोडता येणार नाही. त्यासाठी राज ठाकरेंसोबत गेल्यात दोन गोष्टी एकाच वेळी बंडखोरांना साधता येणार आहेत. एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरं म्हणजे ठाकरे हे नाव! हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत आम्ही गेलो, असा युक्तिवादही शिंदे गट करु शकतो.

एककीडे काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात स्पर्धा करण्यासाठी यापुढे शिवसेनेत मर्यादा येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर थेट भाजप प्रवेश करण्याऐवजी मनसे हा त्यातल्या त्यात सुरक्षित पर्यात असू शकतो का, याचीही चाचपणी गेली जाण्याची शक्यता आहे.

Edited BY - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT