Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! तब्बल 40 आमदारांनी 'मविआ'चा पाठिंबा काढला; शिंदे गटाच्या याचिकेत दावा

शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत हा दावा करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 40 आमदारांनी महाविकास आघाडीचा (Shivsena) पाठिंबा काढला असल्याचा दावा शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं जाहीर केलं आहे. शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी 40 आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 हून आमदारांसह बंड पुकारलं आहे. त्यामुळे शिवसेना आता शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. या आमदारांनी 48 तासात आत नोटीशीला उत्तर दिलं नाही तर, त्यांना निलंबीत करण्यात येईल असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याची वेळ केली आहे. विधानसभेच्या नियमानुसार त्यासाठी 7 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. पण, उपाध्यक्षांनी फक्त 2 दिवसांचा वेळ दिला. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसीला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिंदे गटानं केली आहे.

सुप्रीम कोर्टात आज जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत उपसभापती, राज्य विधानसभेचे सचिव, महाराष्ट्र सरकार, शिवसेनेचे उपनेते अजय चौधरी, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींचा समावेश आहे. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे मांडत आहेत. तसेच शिवसनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतआहेत.

दरम्यान, शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी 38 आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडं 115 आमदाराच उरले आहेत.त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे आता मविआ सरकार अडचणीत सापडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी, लग्जरी घड्याळे अन् दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला

Maharashtra News Live Update: जेजुरीत भाविकांना भंडारा घेण्यासाठी सक्ती कराल तर खंडणी समजली जाईल, पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा

Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

यंदा पावसाळ्यात लांब कुठेच नको! मुंबईपासून जवळ असलेल्या 'या' 5 सुंदर ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात येईल भारी मज्जा

SCROLL FOR NEXT