Uday Samant, Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरील आरोपाला शिवसेनेचे प्रत्युत्तर

मनसेला अयोध्येतील खासदाराने विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला. यावरुन आज राज ठाकरे यांनी शिवसेनेवर आरोप केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज मनसेची (MNS) पुण्यात सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यावरुन उत्तर प्रदेशमध्ये राजकारण पेटले होते. मनसेला अयोध्येतील खासदाराने विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला. यावरुन आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेवर आरोप केले. उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराला महाराष्ट्रातून रसद पुरवली असा आरोप राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला. या आरोपाला शिवसेना (Shivsena) नेते उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.

उत्तर प्रदेशातील भाजप (BJP) खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला, यात शिवसेनेचा काही संबंध नाही. शिवसेनेने ही भूमिका घ्यायला सिंह यांना लावली नाही, असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले आहे. शिवसेनेच काय हिंदुत्व आहे ते नुकतीच अतिविराट सभेतून उद्धवजींनी दाखवले आहे, असंही सामंत म्हणाले.

जो काही मेसेज द्यायचा होता, तो गेला नाही असं दिसतय. सुंस्कृत व्यक्ती काय असते ते उद्धव ठाकरेंकडे पाहून दिसते. नुसतं राजकारण नाही तर सर्वांना घेऊन विकास करणं हे मागचे कारण आहे. औरंगाबादचे नामंकरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करतील, असंही सामंत म्हणाले.

छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्य सभेच्या उमेदवारीवरुन बोलताना सामंत म्हणाले, छत्रपती संभाजी राजेंनी शिवबंधन बांधले तर आनंदच आहे. ते मला भेटले याचा राजकिय संबध नाही, आणि तो कुणी लावूही नये, असंही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT