Shivaji Park Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे गटाचं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचं स्वप्न भंगलं; हायकोर्टाने याचिका फेटाळली

न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेचं मुंबई महापालिकेने दिलेलं कारण योग्य असल्याचं म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सकाळपासून सुनावणी सुरु आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.

पालिकेने परवानगी नाकारल्यानंतर दोन्ही गटांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणावर आज न्यायालयाने सुनावणी वेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचं स्वप्न भंगलं आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय यावेळी न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुंबई महापालिकेने दिलेलं कारण योग्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय या प्रकरणावरील अद्याप सुनावणी संपली नसली तरी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT