Shivsena uddahv thackeray group  saam tv
मुंबई/पुणे

ऋतुजा लटकेंच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह; ठाकरे गटाकडून 'मातोश्री'च्या' विश्वासू नेत्याच्या नावाची चर्चा

शिवसेना ठाकरे गटाने आणखी एक पर्यायी उमेदवार देण्याची रणनीती आखलल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूशांत सावंत

Andheri By-Election : अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून उमदेवारी मिळणाऱ्या मुंबई महापालिका (BMC) कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने आणखी एक पर्यायी उमेदवार देण्याची रणनीती आखलल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या मुदतीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आणखी एक किंवा दोन उमेदवार डमी म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. लटकेंच्या राजीनाम्यावरून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली तर डमी उमेदवारापैकी एकाची ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली जाईल.

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे पर्यायी उमेदवार म्हणून अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि मातोश्रीचे विश्वासू माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं नाव पुढे येत आहे. तर दुसरीकडे राजीनामा मंजूर करावा यासाठी ऋतुजा लटके या महापालिका मुख्यालयात ठाण मांडून बसल्या आहेत. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत : ऋतुजा लटके

ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चाही सुरु झाली होती. यावर आता ऋतुजा लटके यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. सोबत त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टमुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मी एकनिष्ठ आहे, मी अंधेरीची पोटनिवडणूक लढती तर ती मशाल या चिन्हावरच लढेन, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेल जेएनपीटी मार्गावर कारवर गर्डर कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tharala Tar Mag! : सायलीला लागले डोहाळे, अर्जुन लाडक्या बायकोसाठी बनवतो लाडू; प्रियामुळे दोघांच्या आनंदाला लागणार ग्रहण | VIDEO

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Nashik : नाशिकातील पर्यटनस्थळ बनतायत गुन्हेगारीचा अड्डा, भावलीत पर्यटकांवर हल्ला; ९ जणांवर गुन्हा

Bhajyachi Amti Recipe : वरण - भात कशाला? आजच बनवा ही झणझणीत भज्यांची आमटी

SCROLL FOR NEXT