आगामी काळात देशातील काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं, अशी खुली ऑफर मोदींनी दिली आहे. त्यांच्या या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान बाजूला ठेऊन राष्ट्रहिताचा बळी देऊन नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बाजूला जातील. कुणी याचा विचार स्वप्नातही करणार नाही. मोदींना समोर त्यांचा पराभव दिसतोय", असं संजय राऊत म्हणाले .
"गेल्या १० वर्षात देशाच्या स्वप्नाची वाट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या राज्यकारभाराने लावली आहे. आमचं स्वप्न आहे की, मोदींना सत्तेवरून खाली खेचायचं. या देशातील हुकूमशाहीचा पराभव करायचा. या देशातील सविधान वाचवायचं", असं राऊत यांनी म्हटलं आहे. आमच्या स्वप्नाला हातभार लावून पंतप्रधान मोदी सत्तेवरून पायउतार होत असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असा टोलाही राऊत यांनी मोदींना हाणला आहे.
पंतप्रधान मोदींच्या ऑफरवर ठाकरे गटाचे संभाजीनगरचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "मला वाटतं की, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. म्हणून पंतप्रधान मोदी आता अशा प्रकारच्या ऑफर देत आहेत", असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
"आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करायची आणि नंतर त्यांनाच एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर द्यायची. ही मोदींची दुटप्पी भूमिका आहे", असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.