Sanjay Raut on Anna Hazare Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाराष्ट्रात घोटाळ्यांचा पाऊस, अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसावं; संजय राऊतांचा सल्ला

Sanjay Raut on Anna Hazare : अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण महाराष्ट्रात शिखर बँक हा एकच घोटाळा झाला नसून गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळ्यांचा पाऊस पडला आहे", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

शिखर बँकेत कुठलाही घोटाळा झाला नाही, असा क्लोजर रिपोर्ट सादर करत आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिनचिट दिली होती. मात्र, या क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला. कोर्टाने देखील त्यांचा आक्षेप मान्य केला असून निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण महाराष्ट्रात शिखर बँक हा एकच घोटाळा झाला नसून गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळ्यांचा पाऊस पडला आहे", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्याविरोधात अण्णा हजारे यांनी आवाज उठवून रामलीला मैदानावर उपोषणाला बसावं. आमच्या त्यांना पाठिंबा असेल, असंही राऊत म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या १० वर्षात देशासह राज्यात अनेक घोटाळे झाल्याचा आरोप केला. या घोटाळ्यांविरोधात अण्णा हजारे यांनी आवाज उठवला पाहिजे. त्यांनी दिल्लीत जाऊन रामलीला मैदानावर उपोषण केलं पाहिजे, असा सल्लाही संजय राऊत दिला.

संजय राऊत म्हणाले, "शिखर बँक बाबतीत अण्णा हजारे जागे झाले. त्याबद्दल त्यांच अभिनंदन करतो. पण फक्त शिखर बँकेपुरते बघू नका राज्यात घोटाळ्यांचा पाऊस पडला असून अनेक घोटाळे झाले आहेत. अण्णाने इलेक्ट्रॉल बॉण्ड, आयएनएस विक्रांत या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला पाहिजे".

"तपास यंत्रणांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार, अजित पवार आणि त्यांचे ४० आमदार यांच्यावर देखील अनेक आरोप केले होते. आता ते भाजपसोबत गेल्याने हे घोटाळे मागे घ्यायंच काम सुरू आहे. त्याच्यावर देखील अण्णांनी आवाज उचलला पाहिजे. त्यांनी रामलीला मैदानावर जाऊन उपोषण करायला हवं. आमचा त्यांना पाठींबा असेल", असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT