Maharashtra CM Eknath Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री; राऊतांच्या वक्तव्याने नवा वाद?

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सुरज सावंत

मुंबई : एक मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उल्लेख अडाणी असा केला आहे. महाराष्ट्राचे एकमेव अडाणी मंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Shivsena Vinayak Raut Latest News)

पुण्यातील एका उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आलं होतं. या उद्यानाच्या उद्घाटनाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार होते. मात्र नाव देण्यावरून वाद निर्माण झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावरून टीका करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?

'गुडघ्याला बाशिंग बांधून वावरणारे हे एकनाथ शिंदे, त्यांना ना शिक्षणाचा पत्ता ना इतर सरकारी प्रक्रिया कशा असल्या पाहिजे त्याचा पत्ता नाही. कुठेतरी स्वत:च नाव द्यायचं आणि त्याचं नामकरण करायचं. अशा पद्धतीचे महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या इतिहासात होईल' असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी त्यांना पदाला शोभेल असं वर्तन देखील केलं पाहिजे असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. 'ज्या उद्यानाला नाव द्यायंच होतं त्या उद्यानाच्या नावाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूरच केला नाहीये. त्याठिकाणी केवळ एकनाथ शिंदे यांचं नाव येतंय. म्हणून उद्घाटनाला जातात यापेक्षा अडाणीपणा कोणता असू शकतो'. असं विधानही विनायक राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, आधीच राज्याच्या राजकारणात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा राजकीय संघर्ष सुरू असताना, विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख अडाणी असा केल्याने आता शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT