Shiv Sena Mla Disqualification Case Saam Tv
मुंबई/पुणे

Mla Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट करतंय वेळकाढूपणा, ठाकरे गटाचा मुंबई हायकोर्टात नवा अर्ज

Maharashtra Politics: आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केला आहे.

Satish Kengar

आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळून लावण्याची विनंती करत ठाकरे गटाचे अजय चौधरी न्यायालयात केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालयात याचिका करून शिंदे गट वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप या याचिकेतून चौधरी यांनी केलेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना शिंदेंचीच स्पष्ट करताना ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयाला प्रतोद भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल करून दिनांक १०/०१/२०२४ रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला अपात्रतेसंदर्भातील निकाल चुकीचा बेकायदेशीर, कायद्यात न बसणारा व घटनाबाह्य आहे, असा आरोप केला. तसेच कोणीच अपात्र नाही, असा दिलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली होती.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना अपात्र घोषित करावे, अशी मागणीसुद्धा शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी याचिकेत केली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागलेल्या व त्यांच्या सोयीच्या असलेल्या विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात त्यांनीच याचिका का केली ? असा प्रश्न आमदार अजय चौधरी व शिवसेना ठाकरे

मुंबई उच्च न्यायालयातील या याचिकांची सुनावणी तातडीने घ्यावी यासाठी दोनदा तसे प्रयत्न भरत गोगावले यांच्यातर्फे करण्यात आले, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतकीच तातडीची गरज होती तर १०/१/२०२४ रोजी अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निकालाचे लेखक असलेल्या प्रतिवादी क्रमांक 2 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याचिकेबाबत तातडीने त्यांचे म्हणणे न्यायालयात सादर करावे, असा आग्रह का करण्यात आला नाही, प्रश्न अजय चौधरी यांनी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून न्यायालयाच्या समोर मांडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT