ShivSena News, Political Crisis in Maharashtra, Latest Political News, Kalyan, Harshwardhan Palande Saam tv
मुंबई/पुणे

शिवसेनेत खूप उडतोयास असं म्हणत उपशहर प्रमुखावर झाला जीवघेणा हल्ला; एकनाथ शिंदे गटाने आराेप फेटाळले

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

प्रदीप भणगे

कल्याण : शिवसेनेचे (shivsena) कल्याण (kalyan) उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे (harshwardhan palande) यांच्यावर आज (बुधवार) सकाळी हल्ला झाला. शिवसेनेत खूप उडतोयास अस म्हणत हल्लेखोरांनी पालांडे यांच्यावर हल्ला केल्याचा त्यांनी माध्यमांना सांगितलं. हा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाने केल्याचा आराेप हाेता तसेच त्याबाबतही चर्चा रंगली हाेती. दरम्यान मारहाणीच्या आराेपांबाबत शिंदे समर्थकांमधील एका माजी नगरसेवकाने चर्चा खाेटी असून आमचा काही संबंध नसल्याचे म्हटलं आहे. (kalyan latest marathi news)

पालांडे रुग्णालयात दाखल

आज सकाळी कल्याण पूर्बेतून संतोषी माता रस्ता परिसरातून वाहनातून जात असताना तीन ते चार अज्ञात लाेकांनी कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्लेखाेरांनी तलवार व लोखंडी रॉडने त्यांना मारले. त्यानंतर पालांडे यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

माजी नगरसेवकावर आराेप

हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

माजी नगरसेवकानं आराेप फेटाळले

दरम्यान महेश गायकवाड यांनी या आरोपांचं खंडन केलं. ते म्हणाले हल्ला झाला हे दुर्दैवी. माझा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी तपास करुन दाेषींवर कारवाई करावी. माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणा-यांच्या विरोधात मी न्यायालयात दाद मागेन असा इशारा देखील गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT