Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

औरंगाबाद नाही, संभाजीनगर मी नाव दिलंय; बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील नवा टीझर

८ जून रोजी शिवसेनेची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: शिवसेनेची (Shivsena) मुंबईत १४ मे रोजी सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे ८ जून रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेने नवा टीझर लाँच केला आहे. हा टीझर बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील विधानाचा आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद नाही, संभाजी नगर. मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय, अस वाक्य बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आवाजात आहे.

शिवसेनेच्या मुंबईतील सभेनंतर औरंगाबादच्या नावावरुन टीका सुरु झाल्या होत्या. महाविकास सरकार तुमचेच आहे, तर तुम्ही आतापर्यत औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवायला पाहिजे होते, अशा टीका विरोधकांनी केल्या होत्या. यावर आता ८ जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर देणार आहेत.

१४ मे रोजी शिवसेनेची (Shivsena) मुंबईतील बीकेसी मैदानात सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत प्रत्युत्तर दिले होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मे रोजी मुंबईत सभा घेऊन प्रत्युत्तर दिले होते. आता या टीकेला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

८ जूनला होणाऱ्या सभेचा टीझर शिवसेनेने आज लाँच केला आहे. औरंगाबाद येथे शिवसेना शाखेचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. काही दिवसापूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये पाण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर मनसेने सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT