BMC Commissioner Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; सर्वच पक्षांची कार्यालये केली सील, काय आहे कारण?

मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Mumbai News : मुंबई महापालिकेत बुधवारी मोठा राडा झाला. पक्षकार्यालयावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. महापालिकेतील कार्यालयावर शिंदे गटानं दावा केला. त्यानंतर हा राडा झाला. या राड्यानंतर आता प्रशासकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

एकीकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगलेला असताना, दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांनी शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेविका शितल म्हात्रे, माजी आमदार अशोक पाटील, युवा प्रमुख दिलीप नाईक व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून विषयावर चर्चा केली.

शिंदे गटाच्या हालचालींची माहिती मिळाताच, उद्धव ठाकरे गटातील माजी आमदारांसह शिवसैनिकांची मोठी फौजच तिथं पोहोचली आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. कार्यलयाच्या हॉलमध्ये दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं.

दरम्यान, या राड्यानंतर आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे. सदरचे कार्यालय मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले आहे, अशी नोटीस पक्षांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

Warehouse collapse: गोदामाचे छत कोसळून 9 जणांचा मृत्यू; 15 जण अजूनही मलब्याखाली

Shocking : "आई मला माफ कर..." नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; तो शेवटचा व्हिडिओ पाठवला अन्...

Indrajaal : 'इंद्रजाल'चा फर्स्ट लूक; गुप्त खजिन्याचा शोध लागणार? कोण-कोणते कलाकार झळकणार?

SCROLL FOR NEXT