police Station Saam tv
मुंबई/पुणे

किरकोळ वादातून शिवसेना पूर्व शाखा प्रमुखच्या मुलाकडून एकाला बेदम मारहाण

नालासोपारा तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी अटक

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार: नालासोपारा पूर्व नगीनदास पाडा मधिल पूर्व शिवसेना (Shivsena) शाखा प्रमुख गणेश मेधेकर यांचा मुलगा सागर मेधेकर याने एका व्यक्तीला करण नसताना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ किरकोळ वादातून सागर मेधेकर यानी अब्दुल हाफिज नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

हे देखील पहा -

शिवसेना पूर्व शाखा प्रमुख यांचा मुलगा रिक्षा चालक आहे.अब्दुल हाफिज हे आपल्या मुलाला ट्युशन क्लास मधून घरी परत घेऊन जात असताना सागर मेधेकर यांनी हाफिज यांना रिक्षाने धडक दिली. मात्र हाफिज यांनी मेधेकर याला विचारना केली असल्याच्या रागातून सागर मेधेकर याने हाफिज यांना बेदम मारहाण केली आहे.

अब्दुल हाफिज यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना नजीकच्या नालासोपारा मधिल वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात आरोपी सागर मेधेकर याला तुलिंज पोलीसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT