CM Eknath Shinde Dasara Melava Speech Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde Speech: 'होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी', CM शिंदेंनी मैदान गाजवलं

Shinde Group Dasara Melava 2024 आज आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा तिसरा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Satish Kengar

''माझी दाढी खुपतेय, पण मी सांगतोय. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी. अन् महाराष्ट्राच्या विकासाची धावू लागली गाडी'', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केलीय. आज शिवसेना शिंद गटाचा आज आझाद मैदानात तिसरा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे.

शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. दहा लाख लाडके भावांना भत्ता देणारे हे सरकार आहे. सर्वात मोठं मेट्रोचं जाळ करणारे हे राज्य... मागील अडीच वर्षात सरकारने घेतलेले निर्णय पाहिले तर कुठे आले असे वाटेल. कोविड काळात घरात लपून बसणारा मुख्यमंत्री नाही.. लोकांच्या हितासाठी लढणारा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं तर उद्योग आले नसते, नोकऱ्या मिळाल्या नसत्या. लाडक्या बहि‍णींची योजना आली नसती. शासन आपल्या दारी आले नसते. जेष्ठांना वयोश्री योजना आली नसती.''

ते म्हणाले, ''पहिल्या अडीच वर्षात काय झालं सर्वांना महितेय. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटाला लावला होता. समृद्धी, जलयुक्त शिवार, मेट्रोला ब्रेक.. जिथे नव्हता ब्रोकर तिथे लावला ब्रेक.. हेच त्यांचं धंदे होते. आम्ही हे सर्व स्पीडब्रेकर उखडून टाकले. त्या सरकारलाही उखडून टाकले.''

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''२० वर्षे मुंबईत तुमची सत्ता होती. लोकांच्या सुख-दुःखाशी काही घेणं नव्हतं. धारावी हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण त्यामध्येही काड्या करण्याचे धंदे सुरु आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना प्रकल्प का रद्द केला. हे सर्वांना महितेय. तुम्ही बंगले बांधा अन् यांना चिखलात ठेवा.''

शिंद म्हणाले, ''पात्र असणाऱ्यांना आधी घरे द्या, म्हटले होते (मविआ सरकार). मी सर्वांना घरं देण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्यांच्या आय़ुष्यात बदल घडला पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, धारावीकरांच्या पाठीशी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT