उद्धव ठाकरे Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसैनिकांनो घरी जा; मातोश्रीकडे यायची कुणाची हिंमत नाही - ठाकरे

आम्ही रात्रभर येथेच पहारा देणार असून वेळ पडली तर आम्ही दुसऱ्या दिवशीही `मातोश्री`बाहेरच थांबू अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'मातोश्री' (Matoshri) निवासस्थानासमोर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दांपत्य असा सामना रंगला आहे. राणा दांपत्याच्या या इशाऱ्यानंतर आज सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर दिवसभर गर्दी केली होती. उद्या हनुमान चालीसेचे पठण करण्यासाठी रवी राणा आणि नवनीत राणा आज भल्या सकाळीच अमरावतीहून मुंबईत दाखल झाले आहेत.

हे देखील पाहा :

आज, दुपारी पत्रकार परिषद घेऊन उद्या सकाळी आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठाण करणार असा निर्धारच राणा दांपत्याने केला आहे. दरम्यान, सकाळपासूनच मातोश्रीबाहेर गर्दी केलेल्या सर्व शिवसैनिकांची भेट घेत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व शिवसैनिकांना हात जोडून नमस्कार केला आणि सर्व शिवसैनिकांना आपापल्या घरी जाण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना म्हणाले. तुम्ही कृपा करून सगळे घरी जा, ‘मातोश्री’कडे यायची कोणी हिंम्मत करणार नाही. तुम्ही सगळे दिवसभर इकडे आहात. त्यामुळे तुम्ही आता आपापल्या घरी जावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना केली. त्यावर शिवसैनिकांनी तेथून न जाण्याचा पवित्रा घेतला आहे. शिवसैनिक म्हणाले, साहेब, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही राणांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही रात्रभर येथेच पहारा देणार असून वेळ पडली तर आम्ही दुसऱ्या दिवशीही `मातोश्री`बाहेरच थांबू अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT