Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : अंगावर आले तर शिंगावर घ्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला झाला. पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिकांकडून (Shivsena) हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. दरम्यान, अंगावर आलेत तर शिंगावर घ्या असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत बोलताना केलं असल्याची माहिती आहे. (CM Eknath Shinde News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांसोबत आज चर्चा केली या चर्चेत त्यांनी हे विधान केलं असल्याची माहिती आहे. शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. आधीच या आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. आता त्या सुरक्षेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात पुणे कोर्टानं पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये शिवसेना हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात, पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही समावेश आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील दरी अधिक वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. कारण या हल्ल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांचा पाशा पटेल यांना लगावला टोला

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

Holi Special Gujiya Recipe : किचकट काम होईल सोपं, 10-12 गुजिया एकाच वेळी बनतील, फक्त वापरा 'ही' ट्रिक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केल्यानंतरही लगेच नाही मिळणार १५०० रुपये, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT