Shinde Sena workers protest outside Pune Municipal Corporation, dumping garbage and climbing the main gate amid rising tensions with BJP. saam tv
मुंबई/पुणे

भाजपच्या विरोधात शिंदेसेनेचे जोरदार आंदोलन, सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात, नगरसेवक थेट महापालिकेच्या गेटवर चढले

Shinde Sena Protest Against BJP In Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात शिंदे गटाचे जोरदार आंदोलन; कार्यकर्त्यांनी कचरा टाकत निषेध, काही जण गेटवर चढले. भाजप-शिंदे युतीत तणाव वाढल्याचे संकेत.

Omkar Sonawane

पुणे महानगरपालिकेच्या कथित ढिसाळ, निष्क्रिय आणि गलथान कारभाराविरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना पुणे शहरच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत महापालिकेच्या गेटसमोर कचरा टाकून निषेध नोंदवला. शहरातील स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी पालिकेच्या इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी पालिकेच्या गेटवर चढून आंदोलन अधिक तीव्र केल्याचेही पाहायला मिळाले.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत महापालिका पूर्णपणे अपयशी ठरत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरातील नागरी समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.

विशेष म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांमध्ये शिंदेसेना आणि भाजप अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले. एकमेकांवर जोरदार टीका देखील केली. निवडणुकीचे निकाल लागताच संख्याबाळ जुळवून सत्तेत बसले. महापौर-उपमहापौर,या पदाच्या वाटाघाटी झाल्या. मात्र आता हेच दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात सकाळपासून पावसाची दमदार हजेरी पिकांना नवसंजीवनी

कंटोळीच्या काचऱ्या; गावरान पद्धतीची सोपी रेसिपी

Nashik: खड्ड्यांवरून ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांची बाचाबाची, नाशिक महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा

खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

VIDEO : पुलावरील रस्त्याला भेगा, एका बाजूच्या भिंतीला तडे...मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास धोकादायक

SCROLL FOR NEXT