Shinde Government News  Saam TV
मुंबई/पुणे

Shinde Government : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जाचं टेन्शन दूर होणार, शिंदे सरकारकडून मोठी घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Shinde Government News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे या योजनेचे नाव आहे. राज्य सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आहे. शिंदे सरकारने (Maharashtra Government) शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या पाच महिन्यात ४ हजार ७०० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

शिंदे सरकारने 29 जुलै रोजी शेतकरी (Farmer) कर्जमुक्ती योजनेचा निर्णय घेतला होता. 29 ऑगस्ट रोजी कर्जमुक्ती योजनेसाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची घोषणा केली होती. 16 सप्टेंबर रोजी 2 हजार 350 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. (Maharashtra Latest News)

18 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या हप्त्यापोटी 650 कोटी मंजूर करण्यात आला. तर 17 जानेवारीला तिसऱ्या हप्त्यापोटी 700 कोटी मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी शिंदे सरकारकडून शिल्लक एक हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिंदे सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT