Sharad Pawar Speech Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Sharad Pawar Speech in Mumbai : शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातील किस्सा सांगितला. तसेच त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी देखील सांगितली.

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर कराडच्या लोकांनी त्यांच्या मातोश्रींना माहीत नव्हतं. त्यांनी थेट मुख्यमंत्री म्हणजे काय? असाच प्रश्न विचारला. त्यानंतर लोकांनी त्यांना समजावून सांगितले, असा किस्सा शरद पवार यांनी सांगितले. ते मुबंईत बोलत होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

काळ संघर्षाचा होता, मराठी माणसाला अजिबात मान्य नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. त्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र प्राप्त होईपर्यंत कुठल्याही गोष्टीला समर्थन द्यायचं नाही, अशी एक मानसिकता नागरिकांची होती. ते समर्थन देत नाहीत, त्याला जे जे कोणी जबाबदार असतील त्या लोकांचे दिवस कठीण होते.

त्या कठीण काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामंजस्य कसं करता येईल? प्रश्नांची सोडवणूक कशी करून घेता येईल? याची चिंता चव्हाण साहेबांकडे होती.

मोरारजी भाईंचं राज्य गेलं, चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. कौटुंबीक पार्श्वभूमी इतकी साधी होती की, त्याचं एकच गमतीचं उदाहरण की, त्यांच्या मातोश्री त्यांचं नाव विठाबाई. त्या कराडला राहायच्या. यशवंत चव्हाण यांची मुंबईत मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

यानंतर कराडच्या लोकांनी जाऊन त्यांच्या मातोश्रींना सांगितलं की, यशवंतराव मुख्यमंत्री झाले. मातोश्रींनी प्रश्न विचारला की, मुख्यमंत्री म्हणजे काय? ते म्हणे मोठा माणूस झाला. त्या माऊलीने विचारलं मोठा माणूस म्हणजे काय? आता तहसीलदार इतका मोठा? कारण तिच्या दृष्टीने आयुष्यात गावचा तहसीलदार, मामलेदार हाच सगळ्यात मोठा माणूस होता.

मी हे सांगितलं एवढ्यासाठी अशी चव्हाण साहेबांची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. अशी पार्श्वभूमी असलेलं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या निर्मितीचे काम त्यांच्याकडून झाले.

उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करायचा? याचे स्वप्न त्यांच्या मनात होते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली, देशातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक केला.

एक काळ असा येऊन गेला की, देशावर संकट आलं आणि त्या संकटाच्या कालखंडामध्ये त्या संकटाशी समर्थपणाने कोणी सामना करू शकेल अशा नेतृत्वाची गरज होती. जवाहरलाल नेहरूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी चव्हाण साहेबांना दिल्लीमध्ये घेतलं. ते संरक्षण मंत्री झाले.

भाग्य असं की संरक्षण मंत्री पदाची सूत्र घेतली आणि आक्रमक चीनने आपलं सैन्य परत घेण्यासंबंधीची पाऊलं टाकली. यशस्वी संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता. इतरही अनेक कामं त्यांच्याकडे सोपवली गेली.

गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, परराष्ट्र मंत्री झाले, या सगळ्या गोष्टी पदाच्या दृष्टीने मोठे आहेत. पण खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे ग्रंथप्रेम.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT