Ajit Pawar, Sharad Pawar saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवार कुठायेत? पत्रकार परिषदेतील अनुपस्थितीवर सुरू झालेल्या चर्चांना शरद पवार यांनीच दिला पूर्णविराम!

Latest News: शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार अनुपस्थित असल्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

Priya More

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला. यशवंतराव चव्हाण सेंटरवर पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत अजित पवार अनुपस्थित असल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना शरद पवार यांनी स्वतःच पूर्णविराम दिला. 'पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार हजर असतात का?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार हे अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतील, अशी माहिती साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला. शरद पवार यांनी आज, शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अनुपस्थित होते. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट शरद पवार यांनाच याबाबत प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिले. 'कुणी आहे की नाही याचे काही अर्थ काढू नका. अजित पवार नाराज नाहीत. अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती,' असे पवार यांनी सांगितले. तसेच 'पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार हजर असतात का?' असा प्रश्न त्यांनी पत्रकारांनाच विचारला.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ढोल-ताशे वाजवत फटाके फोडून एकच जल्लोष करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसऱ्यानंतर मिळणार खुशखबर! महागाई भत्ता 63% होण्याची शक्यता

Shivsena Dasara Melava live : शिवतीर्थावर कोणाकोणाची होणार भाषणे? पाहा यादी

Gold-Silver Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी झाली स्वस्त; जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या नवे दर

Tea Vs Coffee: चहा की कॉफी सकाळी काय पिणे फायदेशीर?

Maharashtra News Live Update: दसऱ्याच्या सुट्टीत अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT