Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीने चांगले काम केले. कोरोना काळात चांगले काम केले. प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गेले आहेत त्याची वस्तुस्थिती लोकांना सांगतिली आहे, आणि अजूनही त्यातील आमदार शिवसेनेसोबत आहोत हे स्पष्ट करतील, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. या अडीच वर्षात महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. चांगले निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग फसलेला नाही. गुवाहाटीला गेलेले आमदार परत आले की स्पष्ट होईल बहुमत कोणाच्या बाजूने आहे, पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आहे हे देशाला दिसेल, असंही शरद पवार म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT