Sharad Mohol  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Mohol News : शरद मोहोळवर फायरिंगवेळी आरोपींची घोषणाबाजी, पोलीसही संभ्रमात, तपासाची दिशा बदलणार?

Sharad Mohol News Updates : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर फायरिंग करणाऱ्या मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना पुण्यातील एका कुप्रसिद्ध गुंड्याच्या नावाने घोषणाबाजी केली.

साम टिव्ही ब्युरो

नितीन पाटणकर

Pune News :

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपासात या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. शरद मोहोळला संपवण्यामागे आर्थिक आणि जमिनींचे व्यवहार हे कारण असल्याचं समोर आलं होतं. मात्र आता गँगवारमधून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर फायरिंग करणाऱ्या मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना पुण्यातील एका कुप्रसिद्ध गुंड्याच्या नावाने घोषणाबाजी केली. मात्र आरोपींने अशी घोषणाबाजी नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींना दुसऱ्या एका गुंडाच्या नावाने घोषणाबाजी करून पोलिसांचा तपास भरकटवायचा आहे का? की त्यांना खरंच दुसऱ्या एका गुंडांने शरद मोहोळला संपवण्याची सुपारी होती का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. आरोपी मुन्ना पोळेकर याने केलेल्या घोषणेबाजीमुळे भविष्यात पुण्यामध्ये गँगवार होण्याची शक्यता आहे. (Crime News)

शुक्रवारी ५ जानेवारी रोजदी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या सुतारदराजवळील गुंड शरद मोहोळ यांच्या केबल ऑफिससमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी यावेळी फायरिंग केली होती. या फायरिंगनंतर शरदचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हत्येचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पोळेकरचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. साहिल पोळेकरच्या मामाची यामध्ये मोठं नुकसान झालं होतं. मात्र शरद मोहोळच्या दहशतीमुळे त्यांना काहीही बोलता येत नव्हतं. म्हणूनच मामावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी साहिलने हे पाऊल उचललं.

आरोपींची नावे

याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीये. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT