Shambhuraj Desai, Dance Bar, Navi Mumbai News saam tv
मुंबई/पुणे

Dance Bar : साम टीव्हीनं सरकारला केलं जागं; डान्सबारवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही..., (पाहा व्हिडिओ)

चुकीचं काही वाटल्यास नागरिकांनी देखील थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

ओंकार कदम

Shambhuraj Desai News : नवी मुंबईत (Navi Mumbai) आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार (dance bar) सुरु असल्याचे सचित्रं दर्शन आज साम टीव्हीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखविले. यावेळी साम टीव्हीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचा मुद्दा देखील समाेर आणला. मंत्री देसाईंच्या सूचनांचे पालन केले जात नसल्यानेच राजराेसपणे डान्स बार सुरु राहिले आहेत असे साम टीव्हीने निदर्शनास आणून दिले. या वृत्ताची मंत्री देसाईंनी दखल घेतली. (Maharashtra News)

मंत्री देसाईंनी साम टीव्हीला आणि राज्यातील जनतेला चुकीचं काही घडत असेल तर त्याला आम्ही थारा देत नाही. सर्व प्रकारची चाैकशी केली जाईल. आगामी काळात काेण (police) अधिकारी चुकत असतील तर त्यांच्या निलंबनाची कारवाईचा इशाराही मंत्री देसाईंनी दिला.

मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) म्हणाले यापुर्वी देखील मी चुकीच्या गाेष्टी हाेऊ नयेत यासाठी पाेलिसांना बजावले हाेते. डान्स बार (dance bar video viral) सुरु असतील तर असे चित्र असेल तर आज मी या बाबत पोलीस आयुक्तांना कडक सूचना देतो. तसेच या दोन तीन दिवसात मी स्वतः आयुक्त कार्यालयात जाऊन आढावा घेईन.

जर कुठल्याही पाेलिस ठाणे प्रभारीच्या हद्दीत असले प्रकार आढळून आले तर आता थेट ठाणे प्रभारीला जबाबदार धरून कारवाई केली जाईल. नागरिकांनी देखील थेट माझ्याशी संपर्क साधावा असेही मंत्री देसाईंनी आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT