Shahrukh Khan Saam Tv
मुंबई/पुणे

शाहरुख खानचा बंगला अनधिकृत; 'या' माजी आमदाराचा आरोप

सरकार शाहरुख खान याला पाठिशी घालत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील मन्नत हा बंगला अनधिकृत असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. हा बंगला सरकारी जागेवर असल्याचा पुरावा माझ्याकडे असून, तो पुरावा मी उद्या सादर करणार असल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

शहारूख खानचा बंगला सरकारी जागेवर आहे, याबाबत मी उद्या पुरावे देणार आहे. शाहरुखने सरकारची जमीन बेकायदा घेतली आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो शाहरुख खान याला पाठिशी घालत आहेत. शाहरुखचा टॅक्स घेतला जात नाही, असा आरोपही हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी केला आहे.

शाहरुखचा मन्नत हा असलेला बंगला सरकारच्या जमीनवर आहे, ही जमीन बेकायदा घेतली आहे . सरकार कोणाचेही असो शाहरूख ला पाठीशी घालत आहे. त्याच्याकडून टॅक्स घेतला जात नाही. शाहरूख खान अनधिकृत आणि बेकायदेशीरपणे मन्नत मध्ये राहत आहे. कॅग रिपोर्टचे पुरावे आहेत. ते मी उद्या सादर करणार आहे. सरकार शिवसेनाचे असो किंवा भाजपचे असो याबाबत काहाही करत नाही, असा आरोपही जाधव यांनी केला.

शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज संदर्भात काही दिवसापूर्वी अडचणीत आला होता. आता बंगल्या संदर्भात पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात उद्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव तक्रार दाखल करणार आहेत. उद्या ते या संदर्भात पुरावाही सादर करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT