SHAHAPUR WATER CRISIS saam tv
मुंबई/पुणे

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

Shahapur Musai Village Water Crisis Latest News: शहापूरच्या मुसई गावातील पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ झाला. ग्रामस्थ आणि उपसरपंचांमध्ये वाद झाल्यानंतर संतप्त महिलेने उपसरपंचांच्या डोक्यावर रिकामा पाण्याचा हंडा फेकला.

Omkar Sonawane

फैय्याज शेख, साम टीव्ही

शहापूर तालुक्यातील मुसई ग्रामपंचायतीच्या पाणीप्रश्नावरून शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ झाला. पाण्याच्या समस्येवरून महिलांसाह ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी ग्रामस्थ आणि गावातील उपसरपंच आमनेसामने आले आणि वाद वाढला. गटविकास अधिकारी यांच्या दालनात पाणीप्रश्नावर चर्चा सुरू असताना ग्रामस्थ आणि उपसरपंच यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, यावेळी उपसरपंचांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीतच वाद वाढत गेल्याने कार्यालयातील वातावरण चांगलेच तापले.

यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी एका आदिवासी महिलेने उपसरपंचांच्या डोक्यावर रिकामा पाण्याचा हंडा फेकल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुसई गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती आलेल्या महिलांच्या आंदोलनाला या घटनेनंतर वेगळेच वळण लागले. पाण्यासाठी महिलांना आंदोलन करण्याची करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT