Shahaji Bapu Patil Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले...

'साम'ला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापू पाटलांनी विश्वास व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी कोसळले. सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. या दरम्यान, गुवाहाटी मधील हॉटेलमधील फोनवरील संभाषणामुळे प्रसिध्द झालेले शिवसेनेचे सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज साम टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टीकेल यावर भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी म्हणाले, हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, शरद पवार जे बोलतात नेमके त्याच्या उलटं होत असते. तसेच आताही हे सरकार काही पडणार नाही. अजून अडीच वर्ष या सरकारला धक्का लागणार नाही, असंही पाटील म्हणाले.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी इतिहासातील निवडणुकांचे (Election) संदर्भ दिले. पाटील म्हणाले, १९९५ मध्ये निवडणूक झाली शरद पवार यांनी त्यावेळी राज्याचे नेतृत्व केले होते. ८० आमदार निवडून आले होते. हायकमांडने त्यावेळी सरकार बनवायचे नाही असा निर्णय घेतला. त्यावेळी विधीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शरद पवार हे सरकार लवकरच पडणार असे म्हणत होते. त्यावेळी १९९९ उजडले पण सरकार काही कोसळले नाही, आताही तसंच होणार हे सरकार अजून अडीच वर्ष चालणार आहे, असंही आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.

अडीच वर्ष शिंदे सरकारला धक्का लागणार नाही, असा विश्वास बंडखोर सेना आमदार शहाजीबापूंनी विश्वास व्यक्त केला. तर शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले असल्याचेही पाटील म्हणाले. आम्हाला त्यावेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी निधी दिला नाही. सगळा निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचे खच्चीकरण होत होते, असंही पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

SCROLL FOR NEXT