Sexual Assault on a married woman in fear of a knife, Mumbai Crime News in Marathi Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई हादरली; चाकूच्या धाकावर विवाहितेवर अत्याचार; आरोपींनी बनवला Video

Sexual Assault On Married Women in Dharavi : ओळख लपवण्यासाठी दोघांनीही तोंडाला रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

सूरज सावंत

मुंबई: धारावी (Dharavi) परिसरात घरात एकटी असलेल्या १९ वर्षीय विवाहितेवर (Married Women) चाकूचा धाक दाखवून अत्याचार (Sexual Assault) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दिवसा-ढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime News in Marathi)

मंगळवारी दुपारी विवाहित महिला पोटमाळ्यावर झोपलेली असताना तिचे सासरे दरवाजाला कडी न लावताच घराबाहेर पडले. त्यानंतर दुपारी ४ :३० च्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी घरात शिरून दोघांनीही पोट माळ्यावर झोपलेल्या विवाहितेला चाकूचा धाक दाखवला. (Sexual Assault on a married woman in fear of a knife; Video made by unknown accused)

दोन्ही आरोपींमधील एका आरोपीने विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरा व्यक्ती मोबाइलवर व्हिडिओ बनवत असल्याचे विवाहितेने सांगितले. ओळख लपवण्यासाठी दोघांनीही तोंडाला रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376,376 (डी),425, 354,(ए) 354(बी), 354(डी), 506(2), भादवि सह कलम 67,67 (अ),66(इ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

SCROLL FOR NEXT