Pune : खेड मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

Pune : खेड मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

खेड तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ६ नराधमांनी धमकावून दोन ते अडीच महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर – सुसंस्कृत पुण्यात आज दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. आज पहाटे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण करून ६ वर्षीय चिमुकलीवर रिक्षा चालकाने बलात्कार केला. तर दुसरीकडे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ६ नराधमांनी धमकावून दोन ते अडीच महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार गावातील ६ युवकांच्या विरोधात भा.द.वि.कलम 376(2)(j), 376(3), 354, 354(अ), 506, पोस्को कलम 4, 8, 12 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार गावातील ६ युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खेड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आणखी तीन जण फरार झाले आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज सुनिल रोडे(वय२४), सोन्या घुमटकर (वय २९), आकाश सुनिल शिंदे (वय२१) यांना अटक केली असून, परेश माणिक ढमाले, साईनाथ मुळुक, अवधुत संतोष कनसे, (सर्व रा. चास, ता. खेड ) हे फरार आहेत. यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनसुद्धा तिच्यासोबत लैंगिक कृत्य Sexual acts केले. यातील संशयित आरोपी सोन्या घुमटकर याने पीडितेला धमकी देत जबरदस्तीने अल्पवयीन मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पिडित मुलीला धमकावुन नेत जबरदस्तीने शाररिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केला.

पिडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील वानवडी बलात्काराची घटना ताजी असताना पुणे शहरालगत असलेल्या खेड तालुक्यात अशी घटना घडल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यस्थेवर या घटनांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पुढील तपास महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

SCROLL FOR NEXT