Akola: धक्कादायक! सावत्र पित्यानेच केले अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तक्रारीवरून गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

संतापजनक! पुण्यात सावत्र बापाकडून ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; नराधमाविरोधात गुन्हा दाखल

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, ९ नोव्हेंबरला राहत्या घरात हा धक्कादायक प्रकार घडला.

वृत्तसंस्था

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News: पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. पुण्यात एका सावत्र बापाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, या ११ वर्षीय पीडित मुलीच्या आईचा दुसरा विवाह झाला आहे. या ३२ वर्षीय महिलेली पहिल्या पतीकडून ११ वर्षांची मुलगी असून मुलगी, तिची आई आणि आईचा दुसरा पती असे तिघेही एकत्र राहतात. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, ९ नोव्हेंबरला राहत्या घरात हा धक्कादायक प्रकार घडला.

९ नोव्हेंबरला घरात कुणी नसताना आरोपी बापाने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करत तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार जेव्हा पीडित मुलीच्या आईला समजला तेव्हा तिने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Pune) या ३२ वर्षीय नराधमाविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: रामदास कदम अडचणीत; ठाकरे गटाचा नेता दाखल करणार अब्रूनुकसानीचा दावा

Airtel Cheapest Plan: 3 महिने रिचार्जची गरज नाही, एअरटेलने सादर केले बजेट-फ्रेंडली प्लॅन; वाचा किंमत आणि फिचर्स

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Mhada Lottery : ठाण्यात कुणाला लागली लॉटरी? म्हाडाच्या ५३५४ घरांची सोडत जाहीर, अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Jio Cheapest Plan: जिओने आणला जबरदस्त प्लॅन, ११ महिने सिम बंद होणार नाही; जाणून घ्या किंमत किती?

SCROLL FOR NEXT