Black magic under car candidate Nerul saam tv
मुंबई/पुणे

खळबळजनक! लिंबू, काळी बाहुली, उमेदवाराचा फोटो...; नेरूळमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली जादूटोण्याचा प्रकार

Black magic under car candidate Nerul: नेरुळ परिसरात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली लिंबू, काळी बाहुली आणि उमेदवाराचा फोटो आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेला काळ्या जादूचा प्रकार मानलं जातंय.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण राज्यात महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. अशातच नवी मुंबईच्या नेरूळ परिसर प्रभाग क्रमांत २३ मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली लिंबू, बाहुली आणि त्या बाहुलीवर घोडेकर यांचा फोटा लावण्यात आला आहे. अशा पद्धतीने जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडालीये. या घटनेमुळे स्थानिक परिसरात चर्चेला उधाण आलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जादूटोण्याच्या प्रकाराने विविध चर्चांना उधाण

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनांमुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय. यावेळी घोडेकर हे बहुमताने निवडून येणार असल्याची खात्री विरोधकांना असल्याने हे कारस्थान रचल्याचा आरोप जागृत मतदारांकडून केला जातोय.

नागरिकांकडून घटनेचा तीव्र निषेध

या घटनेचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. निवडणुकीच्या काळात अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना जागा मिळू नये. लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, असंही नागरिकांचं मत आहे. दरम्यान या घटनेमुळे नेरूळच्या या प्रभागातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Chanakya Niti: समोरचा खोटं बोलतोय की खरं कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितले 7 अचूक मार्ग

Tea Mistake: चहा बनवताना या 5 चुका करू नका

SCROLL FOR NEXT