Raigad Irshalwadi Landslide Saam tv
मुंबई/पुणे

Raigad Irshalwadi Landslide:... तर जीवितहानी टळली असती; शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी आधीच इर्शाळवाडीबद्दल केलं होतं 'सतर्क'

Prachee kulkarni

Raigad Irshalwadi Landslide News: हवामान विभागाचा डाटा आणि स्थानिक नोंदी या माध्यमातून दरडीबाबत अचूक अलर्ट देणारी 'सतर्क' नावाची यंत्रणा शास्त्रज्ञ आणि नागरिकांनी सुरू केली. शास्त्रज्ञ आणि नागरिकांनी सुरू केलेल्या यंत्रणेने इर्शाळवाडीबाबत देखील सतर्क केलं होतं. वेळीच जर या सूचनेवर काम झालं तर जीवितहानी टळू शकली असती, असे मोठं वक्तव्य शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केलं. (Latest Marathi News)

शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी इर्शाळवाडीबाबत भाष्य केलं आहे. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, 'भुसख्लन आणि दरड कोसळणे एका खात्याच्या अंतर्गत विषय येत नाही. पावसाळ्यातच दरड कोसळतात. चक्रीवादळ म्हटलं तर मान्सूनच्या आधी येतं. मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तरच वृत्त वाहिनीत दाखवलं जातात. आतापर्यंत अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. त्या ठिकाणाचा अभ्यास केला आहे'.

'दरड कोसळण्याला पाऊस देखील एक कारण आहे. दरडी कोसळण्याला केवळ पाऊस जबाबदार नसून तो पाऊस किती तीव्रतेचा आहे, प्रचंड आणि काही काळ पाऊस पडल्यानंतर दरड कोसळते. ज्या दरडीवर मातीचा ढिगारा असतो, त्या ठिकाणी पाणी मुरतं, त्यानंतर ते खडकापर्यंत जातं. त्यामुळे माती खडकाला चिटकून राहिलेली असते, ती माती हळूहळू खाली पसरते, असे शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी पुढे म्हणाले. (Maharashtra Latest News)

'बऱ्याच वेळा शेती करण्यासाठी डोंगर सपाट करतात. रस्त्यांचा विकास करण्यासाठी सुरुंग लावला जातो. त्यामुळे दरडी कोसळण्याचा घटना घडतात. यासाठी महाराष्ट्रातील सहा भाग तयार केले. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात पडणारा पावसाची तीव्रता ही वेगवेगळी असते. इर्शाळवाडीच्या घटनेबाबत सतर्क अॅपच्या माध्यमातून अलर्ट दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT