dead body Saam TV
मुंबई/पुणे

Holi Festival: फुग्यानं केला घात? दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार ठार, पाेलिस चाैकशी सुरु

पाेलिसांनी या अपघाताची कसून चाैकशी सुरु केली आहे.

चेतन इंगळे

विरार : विरार पश्चिम आगाशी येथे झालेल्या अपघातात बूटपाॅलिश करणा-या रामचंद्र हरिनाथ पटेल (वय ५४) यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनूसार सायकल स्वार पटेल यांना दुचाकीने धकड दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दाेघांना (holi festival) रंगाचा फुगा लागल्याने त्यांचे लक्ष विचलीत झाले आणि अपघात (accident) घडला. या अपघाताची चाैकशी अर्नाळा (arnala) पोलिस करीत असून त्यांनी दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले आहे. (virar latest marathi news)

फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्या सणाच्या वेळी अनेक जण रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावे लागत आहे. अशीच एका घटना गुरवारी आगाशी चाळपेठ परिसरात घडली आहे. बूटपॉलिशचे दुकान बंद करून होळी साजरी करण्यासाठी घरी चाललेल्या रामचंद्र हरिनाथ पटेल यांच्या बाबतीत घडली आहे. रामचंद्र सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेने जात असताना शेजारून होळीसाठी गेलेल्या एका वाहनातून काही मुले फुगे मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या मुलांना लागला. त्यामुळे मुलांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि सायकल वरील रामचंद्र यांना जावून धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेतील दुचाकीस्वार हे अर्नाळा गावातील असून त्यांची कसून चाैकशी सुरु असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

SCROLL FOR NEXT