धक्कादायक : सुरक्षारक्षकांनी लिफ्टमध्ये केली महिलेला मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)  सुरज सावंत
मुंबई/पुणे

धक्कादायक : सुरक्षारक्षकांनी लिफ्टमध्ये केली महिलेला मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)

एका 32 वर्षीय महिलेने सुरक्षारक्षक (Security guard) वाईटनजरेने पाहतो म्हणून सोसायटीकडे तक्रार केली होती. मात्र ही तक्रार केल्याच्या रागातूनच या महिलेला मारहाण करण्यात आली.

सुरज सावंत

मुंबई : दादरच्या प्रभादेवीतील ओमेगा लग्जोरियन इमारतीमध्ये एक धक्कादायक प्रकार CCTV फुटेजमुळे उघडकीस आला आहे. या फुटेजमध्ये दोन महिला सुरक्षारक्षकांनी (Security Guard) एका महिलेला लिफ्ट (Elevator) मध्ये घेऊन जातानाची दृष्य दिसत आहेत.

पहा व्हिडीओ -

दादरच्य प्रभादेवीतील (Prabhadevi of Dadar) ओमेगा लग्जोरियन इमारतीच्या परिसरातील एका 32 वर्षीय महिलेने सुरक्षा रक्षक वाईटनजरेने पाहतो म्हणून सोसायटीकडे तक्रार केली होती. मात्र हि तक्रार केल्याच्या रागातून दोन महिला सुरक्षारक्षकांनी सोसोयटीमध्ये तक्रार करणाऱ्या महिलेला लिफ्टमध्ये मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात (Shivajipark Police Station) रजवंत राजपूत त्रिलोकसिंग व प्रियांका बासुतकर यां दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचे CCTV सध्या सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. दरम्यान हे सुरक्षारक्षक आहेत की गुंड असा प्रश्न इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून विचारण्यात येतोय.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

Thursday Horoscope : मानसिक तणाव जाणवेल; ५ राशींच्या लोकांना वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा...

Maharashtra Live News Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, तापमान 40 पार जाण्याची शक्यता

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

SCROLL FOR NEXT