School Closed Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यातील शाळा बंदच राहणार! वाचा पुण्यातील संपूर्ण नियमावली

पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे: कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. परंतु पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे जलतरण तलाव सुरु राहणार आहेत. पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.

त्याचबरोबर उद्याने सकाळच्या सत्रात सुरु राहणार असल्याचीही माहिती अजित पवारांनी दिली आहे. पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू राहतील आणि याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे अजित पवारांनी सांगितले आहे. रुग्णसंख्या अधिक असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. दरम्यान राज्यातील शाळा स्थानीक परिस्थीती पाहून सुरु करण्याला शिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. त्याच अनुषंगाने जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT