savitri nimhan passed away Saam TV
मुंबई/पुणे

Savitri Nimhan: दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचं निधन

Savitri Nimhan Passed Away: दिवंगत आमदार विनायक निम्हण मातोश्रींच्या निधनामुळे निम्हण कुंटुंबियांवर दुहेरी आघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Latest News: पुण्यातून एक दुखःद बातमी समोर येत आहे. दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचं शनिवारी निधन झालं आहे. विनायक निम्हण यांच्या निधनाच्या २० दिवसांच्या आतच काल, शनिवारी त्यांच्या मातोश्रींचंही निधन झालं आहे. त्यामुळे निम्हण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. पाषाण येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Savitri Nimhan News)

विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांचे निधन २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयातच ह्‌दयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीसणात निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे निम्हण कुंटुंबियांवर दुहेरी आघात झाला आहे.

विनायक निम्हण यांची कारकीर्द

विनायक निम्हण हे पुण्यातील (Pune) शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून १५ वर्षे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. सन १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आधीच्या दोन टर्म ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून गेले होते, तर नंतरची टर्म ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून विधानसभेवर गेले होते.

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

विनायक निम्हण यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली होती. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ते देखील नारायण राणेंसोबत पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही काळानंतर नारायण राणेंची साथ सोडली आणि पुन्हा शिवसेनेत परतले होते. ते पुण्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते, परंतु, सध्या ते पक्षात तितके सक्रिय नव्हते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT