KDMC News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News: केडीएमसी कर्मचाऱ्यांच्या महाशिवरात्रीसह शनिवार-रविवारच्या सुट्यांवर रद्द, 3 दिवस सलग करावे लागेल

KDMC Latest News: केडीएमसी आयुक्त इंदू राणी जाखड यांनी केडीएमसीचे या आठवड्यातील शुक्रवार ,शनिवार रविवार प्रत्येक कार्यालय सुरू राहील.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

KDMC Latest News:

केडीएमसी आयुक्त इंदू राणी जाखड यांनी केडीएमसीचे या आठवड्यातील शुक्रवार ,शनिवार रविवार प्रत्येक कार्यालय सुरू राहील. तसेच मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले नित्याचे कामकाज करावयाचे आहे, असे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामुळे उद्याची महाशिवरात्रीची सार्वजनिक सुटी आणि त्याला लागून आलेले शनिवार, रविवार सुट्टीचे मनसुबे आखलेल्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

मार्च अखेर असल्याने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे बोलले जात असले तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. या शक्यतेमुळे केडीएमसीकडून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत गेल्या रविवारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकाचे अधिकारी कर्मचारी आठवडाभरा आधीपासूनच रात्रंदिवस काम करत होते. उद्याच्या शुक्रवारी आलेली महाशिवरात्र आणि त्याला जोडून आलेले शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुट्टीचे मनसुबे आखले होते. मात्र आयुक्त जाखड यांच्या परिपत्रकामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय.  (Latest Marathi News)

8 मार्च ते 10 मार्च सार्वजनिक सुट्टी असली तरी या दिवशी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रत्येक कार्यालय सुरू राहील. तसेच महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले नित्याचे कामकाज करावयाचे आहे, त्याचप्रमाणे उपायुक्त सामान्य प्रशासन यांनी उपरोक्त कालावधीतील विभागनिहाय बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल आयुक्ता कार्यालयास सादर करावा, असे परिपत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी काढले आहे.

मार्च अखेर असल्याने अभय योजनेच्या माध्यमातून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असलं तरी या निर्णयाला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते, या शक्यतेची किनार आहे. आचारसंहिता कधी लागू शकते या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील प्रलंबित कामे त्या आदेश मार्गे लावण्यासाठी सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे बोलले जातेय. या परिपत्रकामुळे अधिकारी कर्मचार्यामध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT