Gunaratna Sadavarten Saam TV
मुंबई/पुणे

गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत; 'हे' आहे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अटक केलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडणारे, त्यांचं नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांना आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आलं आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते यांना कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. ती आज संपली असून आता याच पोलिस कोठडीबाबत न्यायालय काय निकाल देणार त्यांती कोठडी वाढणार की त्यांचा जामीन मंजूर याबाबत ही सुनावणी घेणार येण्यात आहे.

मात्र, महत्वाची बाब म्हणजे सातारा पोलीस (Satara Police) देखील गिरगाव सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. सदाववर्ते यांच्या विरोधात फलटण येथे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे .मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बेताल वक्तव्य केले होते.तेढ निर्माण होईल असे वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती अशी प्राथमिक माहिती कळत आहे.

हे देखील पहा -

या प्रकरणात गुन्हा दाखल असल्यामुळे सातारा पोलिस येथे हजर झाले असून हे पोलिस देखील त्यांचा ताबा मागण्याची शक्यता आहे. सातारा पोलिस अधिकारी भगवान निंबाळकर आले आहेत फलटणच्या एक प्रकरणात घेणार ताबा मागण्यासाठी सातारा पोलीस अर्ज करतील मात्र गावदेवी केसमध्ये त्यांना कोठडी होण्याची दाट शक्यता आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत कोर्टात दाखल सातारा पोलिस सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात पत्र सादर करण्याची शक्यता दोन दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान गावदेवी पोलिसांच्या हाती काय माहिती आलीय हे न्यायालया समोर थोड्याच वेळात मांडली जाणार आहे. तर गावदेवी पोलिस देखील आणखी ताबा मागण्याची शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT