sarthi barti mahajyoti fellowship cet exam paper leaked in pune saam tv
मुंबई/पुणे

CET Exam Paper Leak : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला, विद्यार्थी एकवटले; पुण्यात परीक्षेवर बहिष्कार

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News :

सारथी (sarthi), बार्टी (barti), महाज्योती (mahajyoti) सीईटी (CET Exam) परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (savitribai phule pune university) सेट विभागाचा गलथान कारभाराचा नमुना आज (बुधवार) समाेर आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा निषेध नाेंदवत परीक्षेवर बहिष्कार टाकला.(Maharashtra News)

आज (बुधवार) पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी गाेंधळून गेले.

याबराेबरच प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत या प्रकाराचा निषेध नोंदवला. त्याशिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घाेषणाबाजी केली. सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले. सध्या परीक्षा केंद्रावर पोलीस बोलावण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT