सारथी संस्थेचा कारनामा! जयंती शिवाजी महाराजांची फोटो लावला संभाजी महाराजांचा Saam TV
मुंबई/पुणे

सारथी संस्थेचा कारनामा! जयंती शिवाजी महाराजांची फोटो लावला संभाजी महाराजांचा

संभाजी बिग्रेडने या प्रकरणाचा जाहीर निषेध केला आहे. आणि फोटो बदलण्याची विनंती केली आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati shivaji maharaj) यांची 392 वी जयंती आहे. सारथी संस्थेने महाराष्ट्रात 'शिवजयंती' निमित्त Online 'वक्तृत्व स्पर्धा आयोजीत केली आहे. 'शिवजयंती' संदर्भात सारथी संस्थेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सदर वक्तृत्व स्पर्धेचे बॕनर (डिझाईन) प्रसिद्ध केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati sambhaji maharaj) फोटो लावण्यात आला होता. सारथी संस्था अर्थातच राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करते. यावर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींचे फोटो सुद्धा प्रसिद्ध आहेत. असे असताना नजरचुकीने का होईना राज्य सरकारच्या अधिकृत संस्थेकडून (छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे असणाऱ्या संस्थेकडून) अशी चूक होणे योग्य नाही.

अधिकारी झोपेत काम करतात का...? सारथी संस्थेचे कारभारी कधीच ऐकून घेण्याच्या मानसिकतेचे नाहीत. हेकेखोरपणा करण्याच्या नादात ते स्वतःचा शहाणपणा नेहमी पाजळत असतात आणि त्यांच्या बुद्धीचे उत्तम उदाहरण म्हणजे ही चुकीच्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांचा फोटो छापणे हे कृत्य महाराष्ट्रात तरी चुकीचं आहे अशी संतापजनक टीका संभाजी बिग्रेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सारथी संस्थेने तात्काळ चूक सुधारावी आणि छत्रपती संभाजी महाराजांऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रसिद्ध करावा अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

SCROLL FOR NEXT