Santosh Deshmukh Murder Case Saam Tv
मुंबई/पुणे

Walmik Karad: फरार असताना वाल्मिक कराड पुण्यात कुठे थांबला होता? तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

Santosh Deshmukh Murder Case: खंडणी प्रकरणात अटकेमध्ये असलेला वाल्मिक कराड पुण्यामध्ये होता. वाल्मिक कराड पुण्यामध्ये एका ठिकाणी राहिला होता. त्या ठिकाणाची माहिती समोर आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत वाल्मिक कराडशी संबंधित व्यक्तींनी ऑफीस स्पेसेस विकत घेण्यासाठी व्यवहार केल्याची माहिती समोर आली होती. या इमारतीत अशा दोन ऑफीस स्पेसेस विकत घेणाऱ्यांमध्ये ज्योती मंगल जाधव या महिलेचे नाव आहे. त्यांच्या नावावर कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीत दोन ऑफीस स्पेसेसची खरेदी करण्यात आलीय.

या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील ऑफीस नंबर 610 C ही जागा ज्याच क्षेत्रफळ ४६.७१ चौरस मीटर आहे ज्योती मंगल जाधव खरेदी केलीय. त्याचबरोबर सहाव्या मजल्यावरील 611 B ही आणखी एक ऑफीस स्पेनची जागा ज्याच क्षेत्रफळ ५४.५१ चौरस मीटर आहे ती देखील खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी करताना ज्योती मंगल जाधव यांचा मुळ पत्ता अहमदनगरचा देण्यात आलाय .

या ज्योती मंगल जाधव या वाल्मिक कराडशी संबंधित असुन त्यांची देखील मस्साजोग प्रकरणात चौकशी करण्यात आलीय. या ज्योती मंगल जाधव यांच्या नावे पुण्यात देखील फ्लॅट असून वाल्मिक कराड फरार असताना त्यांच्या घरी थांबला होता अशी माहिती समोर आली आहे. आता वाल्मिक कराड पुण्यामध्ये असताना नेमकं काय काय घडलं या सर्व बाजून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती. वाल्मिक कराड सध्या तुरूंगात असून त्याची कोठडी आज संपली आहे. त्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले आहे. आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

२ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या व माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड या आईने सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT